शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हा परिषदेच्या गटनेत्या थळ जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्य मानसी दळवी यांना रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पद मिळू शकतं १२ मार्च २०२६ रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड झाली रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली
रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ७ फेब्रुवारीला झाली आणि ९ तारखेला मतमोजणी झाली रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी शिंदे गटाला २१ राष्ट्रवादी काँग्रेसला १६ भारतीय जनता पार्टीला १५ ठाकरे गटाला ५ आणि काँग्रेसला २ अशा जागा मिळाल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मिळून महायुतीच सरकार आहे परंतु रायगड जिल्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढला काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी युती केली तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांनी युती केली परंतु ज्यावेळेला कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही निवडणूक पूर्वी युती केली होती म्हणून सत्ता स्थापन करू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आणि त्याच्यानंतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य हे गोव्याला गेले कारण की शिंदे गटाला बाजूला ठेवायचं अस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं मत होतं आणि एक महिन्यानंतर ज्यावेळेला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड करण्याची वेळ आली त्यावेळेला महायुती म्हणूनच रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन झाली. परंतु अध्यक्ष पद भारतीय जनता पार्टीला आणि उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं आहे २० मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व सभापतींची निवड होईल आणि याच्यामध्ये शिंदे गटाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद न मिळाल्यामुळे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद समजलं जाणार बांधकाम सभापती हे पद शिंदे गटाच्या वाटेला जाऊ शकत आणि मानसी दळवी ह्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती होऊ शकतात याच्यासाठी आपल्याला अजून २० तारखेची वाट पाहावी लागेल शिंदे गटाला बांधकाम सभापतीपद मिळते की नाही मिळते की सुनील तटकरे अजून काही राजकीय खेळी करतात हे कोणीही सांगू शकत नाही परंतु एकंदरीत बांधकाम सभापती पद शिंदे गटाच्या वाटेला जाऊ शकत असं चित्र समोर येताना दिसत आहे